भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर जी
आव्हाने उभी राहीली, त्यात सर्वात मोठे आव्हान भीषण
अन्नधान्यटंचाईचे होते. नव्या सरकारने धोरण
आखले.शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत 80 च्या दशकात
देशालाअन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच बनवले नाही
तर जगातील 1 नंबरचा निर्यातदार बनवले. भिक्षेचा कटोरा
घेणारा ही देशाची प्रतिमा बदलून देशाला अन्नधान्याच्या
बाबतीत सक्षम बनवले. अन्नधान्य पिकवून कोट्यवधी जनतेच्या
भुकेचा प्रश्न सोडविणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच
पडली. किरकोळ फरकाने त्याची आर्थिक स्थिती ‘जैसे थे’च
राहिली. उत्पादन वाढले, पण शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे काय? हा
प्रश्न आजच्या मोबाईलक्रांतीच्या जगातही तसाच आहे.