
शरद जोशी यांनी शेती, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि मुक्त अर्थव्यवस्थेविषयी मांडलेल्या विचारांचा आजच्या शेतीच्या संदर्भात नव्याने अभ्यास करण्यासाठी ७–८ महिन्यांची फेलोशिप.

शरद जोशी यांनी शेती, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य, बाजारपेठेचे स्वातंत्र्य, महिला शेतकऱ्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग, ग्रामीण विकास आणि मुक्त अर्थव्यवस्था यांविषयी मांडलेल्या विचारांचा नव्याने अभ्यास करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. हे विचार केवळ इतिहास म्हणून जतन करणे नव्हे, तर आजच्या शेतीसमोरील प्रश्न आणि नव्या संधी यांच्या संदर्भात त्यांचा अर्थ समजून घेणे, तपासणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे.
शरद जोशी यांची सर्वच मांडणी ही जागतिक धोरणे, आर्थिक स्वातंत्र्य, शेती-उद्योग-उद्योजकता, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन व्यवसायासाठी सक्षम होणे, शेतकरी महिलांचा शेतीतील सहभाग निर्णय प्रक्रियेपर्यंत आणणे, निर्णय स्वातंत्र्य या भोवती होती. शरद जोशी यांच्या विस्मरणात गेलेल्या अनेक पैलूंना पुन्हा एकदा समाजासमोर आणणे, जाणून घेणे, परत परत त्याचे चिंतन करावे व त्याचा वापर कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी आज कसा करता येईल, यासाठी हा उपक्रम असेल.
या उपक्रमातून संशोधित केलेल्या साहित्याचा उपयोग ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, शेतीमधील विविध प्रश्नांचे अभ्यासक, कृषी इको-सिस्टीममध्ये काम करणारे सर्व घटक (शेतकरी, शासन, कृषी उद्योग, शिक्षण संस्था, माध्यमे, युवक, विद्यार्थी, आर्थिक-सामाजिक-कृषी अर्थव्यवस्था इ. क्षेत्रातील संशोधक) इ. सर्वच घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
संशोधन, लेखन, संवाद, मुलाखती, चित्रफिती आणि सार्वजनिक सादरीकरण यांच्या माध्यमातून पुढील पिढीसाठी विश्वासार्ह व उपयुक्त साहित्य निर्माण करणे हाच या फेलोशिपचा व्यापक उद्देश आहे.
फेलोशिपसाठी सुचवलेला विषय आणि कामाचा आराखडा या विभागाला निवड करताना विशेष महत्त्व दिले जाईल. उत्तर शक्य तितके नेमके आणि प्रत्यक्ष कामाशी जोडलेले असावे. दिशा मिळावी म्हणून काही उदाहरणे:
हे उदाहरण म्हणून दिलेले विषय आहेत. यापैकीच विषय निवडावा असे काही नाही.
खालीलपैकी एका विषयावर ७००–७५० शब्दांचा स्वतंत्र मराठी लेख अर्जासोबत जोडा:
अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक विभागात काय विचारले आहे ते येथे पाहा. पूर्ण अर्ज PDF स्वरूपात डाउनलोड करा.
खालील सर्व बाबींना स्पष्ट उत्तर द्या. “नाही” असल्यास कारण नमूद करा.
| पात्रता निकष | उत्तर |
|---|---|
| मी फेलोशिपसाठी सलग ७–८ महिने दर आठवड्याला किमान ____ तास देऊ शकतो/शकते. | होय / नाही |
| मी आवश्यक वाचन, क्षेत्रभेटी, मुलाखती, लेखन/दृकश्राव्य निर्मिती आणि सुधारणा पूर्ण करण्यास तयार आहे. | होय / नाही |
| मी मराठीत स्पष्टपणे लेखन/संवाद करू शकतो/शकते. आवश्यकतेनुसार हिंदी/इंग्रजी स्रोत वापरू शकतो/शकते. | होय / नाही |
| मी नियोजित मार्गदर्शन बैठका आणि प्रगती आढाव्यांना उपस्थित राहू शकतो/शकते. | होय / नाही |
| माझ्याकडे या कालावधीत प्रस्तावित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ आणि मूलभूत साधने उपलब्ध आहेत. | होय / नाही |
“नाही” असलेल्या कोणत्याही उत्तराचे स्पष्टीकरण अर्जात द्यावे.
भूमिका, कालावधी आणि नेमके योगदान नमूद करा.
प्रत्येकासाठी शीर्षक, वर्ष, त्यातील तुमची नेमकी भूमिका आणि प्रकाशित लिंक द्यावी किंवा सोबत जोडावे (जोडले आहे, असे इथे नमूद करावे).
येथे कोणतेही ठरावीक “बरोबर उत्तर” अपेक्षित नाही. मुद्दा समजून घेऊन स्वतंत्रपणे विचार करण्याची तुमची पद्धत जाणून घेणे हा प्रश्नाचा उद्देश आहे. ‘असहमत’ म्हणजे फेलोशिप निवडीस अपात्र किंवा निगेटिव्ह मार्किंग नाही, याबाबत खात्री बाळगावी.
फारसे माहीत नाही / अजिबात माहीत नाही
निवड करताना या विभागाला विशेष महत्त्व दिले जाईल. विषयांची उदाहरणे वर दिली आहेत.
हा विषय शरद जोशी यांच्या विचारांशी कसा जोडला आहे आणि आजच्या कृषीक्षेत्रासाठी त्याचा उपयोग काय असू शकतो ते स्पष्ट करा.
उदा. पुस्तके व लेखांचे वाचन, जुनी कागदपत्रे (Archive), क्षेत्रभेटी, सखोल मुलाखती, व्यक्तींच्या आठवणींची नोंद (Oral History), एखाद्या प्रयोगाचा सविस्तर अभ्यास (Case Study), तुलना किंवा आकडेवारीचा अभ्यास (Data Analysis). प्रत्येक मार्ग का वापरणार हे थोडक्यात सांगा.
पुस्तक, लेख, भाषण, जुनी कागदपत्रे, चित्रफीत किंवा संकेतस्थळ: लेखक, शीर्षक, प्रकाशक/माध्यम, वर्ष आणि लिंक (असल्यास) द्या. यापैकी किमान तीन संदर्भ शरद जोशी यांच्या मूळ लेखन किंवा भाषणातील असावेत.
सर्वसाधारण गौरवपर मजकूर टाळा (म्हणजे शरद जोशी यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत वगैरे). हे काम तुमच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या का महत्त्वाचे आहे आणि फेलोशिपमुळे तुम्हाला असे काय करता येईल जे एकट्याने करणे कठीण आहे, हे सांगा.
तीनपैकी एका विषयावर ७००–७५० शब्दांचा स्वतंत्र मराठी लेख. विषय आणि अटी वर दिल्या आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा इतर डिजिटल साधने वापरली असल्यास कोणते साधन, कशासाठी आणि किती प्रमाणात वापरले याचा तपशील द्यावा. शेवटी अर्जदाराची सही, पूर्ण नाव, ठिकाण आणि दिनांक.
भरलेला अर्ज आणि सर्व जोडपत्रे खालील ई-मेलवर पाठवा. अधिक माहितीसाठी फोन करा.